Breaking News

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया नारंगी रंगात Indian team in orange jurcey.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया नारंगी रंगात

Indian team in orange jurcey.

आयसीसी वर्ल्डकप- २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आपल्या पारंपरिक निळ्या रंगाच्या जर्सीमध्येच दिसणार असले तरी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मात्र टीम इंडियाच्या जर्सीत बदल करण्यात आला आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताची जर्सी 'अल्टरनेट जर्सी' असणार आहे. समोरच्या बाजूने ही जर्सी निळ्या रंगाचीच असणार आहे, मात्र मागील बाजूस ही जर्सी नारंगी रंगाची असेल. ही जर्सी अल्टरनेट जर्सी असून ती आयसीसीच्या नियमांवर आधारित आहे.

Indian team jurcey

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात

टीम इंडिया नारंगी रंगात

Indian team in orange jurcey.

आयसीसी वर्ल्डकप- २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आपल्या पारंपरिक निळ्या रंगाच्या जर्सीमध्येच दिसणार असले तरी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मात्र टीम इंडियाच्या जर्सीत बदल करण्यात आला आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताची जर्सी 'अल्टरनेट जर्सी' असणार आहे. समोरच्या बाजूने ही जर्सी निळ्या रंगाचीच असणार आहे, मात्र मागील बाजूस ही जर्सी नारंगी रंगाची असेल. ही जर्सी अल्टरनेट जर्सी असून ती आयसीसीच्या नियमांवर आधारित आहे.

या जर्सीबाबत लोकांमध्ये मतमतांतरे आहेत असे सूत्रांचे म्हणणे आहे. ही अवे जर्सी असल्याचे म्हटले जात आहे, मात्र तसे नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ही एक अल्टरनेट जर्सी असून भारतीय संघाचे खेळाडू ती ३० जून या दिवशी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात परिधान करणार आहेत. आयसीसी नियमांनुसार, यजमान संघाला आयसीसी स्पर्धेत खेळताना आपल्या जर्सीचा रंग कायम ठेवावा लागतो. भारताच्या जर्सीचा रंग निळा असून मागील बाजूस नारंगी रंगाचा बदल करण्यात आला आहे.
भारताचा पहिला सामना बुधवारी साउदम्पटन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. यजमान इंग्लंड संघाने आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. तर, इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, ही दुखापत किरकोळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धनयवाद.

No comments